ते इंजिनीअरिंगचं तृतीय वर्ष होतं आणि नेहमीप्रमणेच या वर्षीही भरपूर इंडस्ट्रियल व्हिजीट्स, तसेच visitsच्या नावाखाली होणाऱ्या ट्रीपस् हे सारं पुन्हा होणारचं होतं...स्थापत्य शाखेची हीच गम्मत असते....कारण स्थापत्यशास्त्र हे चार भिंतींच्या आत बसूनच शिकणं हे शक्य नाही....हे सेमीस्टर सुरू झालं, पाचवं सेमीस्टर खरं तर मला कोणी विचारलं की इंजिनीअरिंगमध्ये सर्वात आवडता कालखंड अथवा आवडतं सेमीस्टर कोणतं तर मी बेशकः पाच असं म्हणतो....कारणे भरपूर आहेत!!....असो!, तर या सेमीस्टर मधल्या व्हिजीट तश्या खूप छान होत्या जवळपास पाच इंडस्ट्रिअल व्हिजीट आम्ही केल्या आणि पाचवी म्हणजे सेमीस्टरच्या अगदी शेवटची visit होती ती म्हणजे जे. एन् पी. टी. व्हिजीट..जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई....उत्तर महारष्ट्रातील असल्यामुळे पोर्ट, समुद्र, जहाजं. या साऱ्या गोष्टीसाठी च आकर्षण साहजिकच मला होतं...खरं म्हणजे पोर्ट सारख्या ठिकाणी एकट्याला फक्त मालवाहतूक भलीमोठी जहाजं बघण्यासाठी, आत कधी प्रवेश मिळेल हे शक्य नव्हतं ..नाहीच!, त्यासाठी तुम्हालाचं मग मालवाहतूक करणाऱ्या क्षेत्रात कदाचित पाऊले टाकावी लागतील किंवा त्यातं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे वशिला लाऊन आत प्रवेश मिळवावा लागेल....पण अशी संधी अगदी चालून आली होती ...मला त्या दिवशी माझ्या कॉलेज आणि विशेषकरून आमची डिपार्टमेंट याच्याबद्दल आदर द्विगुणित झाला...या व्हिजीट्स म्हणजे वेगळाच आनंद असतो..या visit ची घोषणा आमच्या HOD सरांनी केली आणि त्यासाठी वर्गणी गोळा करण्यास ही सांगितली, कारण कॉलेज या visit चा अर्धा खर्च करणार आणि आम्ही अर्धा असं त्यांच्यात ठरलं होतं.. मी CR असल्यामुळे सरांनी मलाचं ते पैसे गोळा करायला सांगितले....पण, दुसऱ्या दिवशी कॉलेज बद्दल आदर आणखीच वाढला ..कारण आता या ट्रीपचा.....visit कॉलेज साठी होती आमच्यासाठी आणि आमच्या डिपार्टमेंट साठीही ती ट्रीपचं होती..!!...तर या ट्रीप कम visit चा सगळा खर्च अगदी जेवणापासून कॉलेजचं करणार होतं....खरं तर याच्या अगदी काही दिवसा आधी आमच्या कॉलेज ल NAAC तर्फे A ग्रेड मिळाली होती आणि कॉलेज सर्वांवर खुश होते; त्याचा हा परिणाम असेल असं आम्ही गृहीत धरलं.
Visit चा दिवस ठरला, सगळी तयारी डिपार्टमेंट मधल्या CESA नामक आमची जी स्टुडंट्स असोशिएशन होती त्यातील आम्हीच निवडलेल्या आमच्याच सहकाऱ्यांनी केली; आणि तो दिवस उजाळला. त्या दिवशी अगदी पहाटेचं निघण्याचा प्लॅन ठरला. आता पहाटे लवकर उठतील ते इंजिनीअर्स कसले!! कारण, उशीर फक्त आम्हीचं नाही तर आमच्या सोबत येणाऱ्या प्रोफेसरस् मंडळींनीही केला. शेवटी तेही इंजिनिअरच !! मग ठरवलेल्या ठीक ६:०० चे ७:३० झाले, आणि आमची bus खरं तर दोन बसेस होत्या, त्या निघाल्या. निघतांना अत्यंत दमदार आवाजाने "छ्त्रपती शिवाजी महाराज की, जय!!!" ही घोषणा साहजिकच झाली आणि महाराजांचं नाव घेऊन आम्ही निघालो....visits किंवा सहल, मित्रांसोबत असो अथवा परिवारासोबत त्यातील आणखी एक सुंदर कालखंड म्हणजे प्रवासाचा; कारण, विविध ठिकाणांना होणारी ती धावती भेट, विविध गावं, दऱ्या, खोऱ्या, घाट, वळणदार रस्ते, गावांची वेगळी नानाविविध नावे, त्यातील विविधता, घरे, गावं रचना या गोष्टींचा ओझरता अनुभव एक सुंदर आठवण असू शकते!!
आम्ही जात असलेलं ठिकाण पुण्याहून साधारणतः ३-३:३० तास अंतरावर होते आणि आमच्या मार्ग होता आपल्या देशातील प्रथम द्रुतगती महामार्ग म्हणजेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग.. गाडी नऱ्हे म्हणजेच जिथे आमचं कॉलेज होत आणि आम्ही राहतही होतो. इथून बाहेर पडली आणि हायवे ने मुंबई च्या दिशेने निघाली. मी पहिल्यांदा द्रुतगती मार्ग पाहणार होतो आणि मला उत्सुकता होती. आता गाडीमध्ये सुरू झाले होते गाणे आणि डान्स. या नृत्यास नृत असं म्हणतात ज्यात नृत्याच्या शास्त्रोक्त बाबी नसतात, पण भरपूर आनंद आणि जल्लोष व्यक्त करण्याचं ते उत्तम साधन असतं आणि यात ज्याला नृत्य नीट नाही करता येत, म्हणजे माझ्यासारखे त्यांनाही सगळा संकोच विसरून निर्धास्त व बेभानपणे नाचण्याची मुभा सुद्धा असते. साहजिकच झिंगाट गाणं सुरू झालं आणि अख्खी बस जल्लोषाने भरून गेली. काही मुलं असतात प्रत्येक ग्रुप किंवा वर्गांमध्ये जे त्यांच्या अजब आणि विचित्र पण तरी खूप आनंददायक आणि सर्वांना हसवणारे नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध असतात. तसेच काही महाभाग आमच्यात सुद्धा होते आणि त्यांनी त्यांचं काम चोखपणे करून सगळ्यांना हसवलं. त्या इवलिश्या जागेत सुद्धा कुठलीही कमतरता न भासता आपल्या मित्रांसोबत नाचण्याची मजा काही औरच..!! यात एखादा असतोच जो नाचत नाही घुम्यासारखा बसून असतो, शांत असतो; त्याला नाचवण्याचं काम सुद्धा मग चोखपणे पार पडलं जात आणि यात सर्वात महत्त्वाचा भाग किंवा आकर्षण असतं ते म्हणजे आपल्या सरांचा नाच आणि तो तर झालाच पाहिजे या नाचात बरेच insta live करत आपला आनंद शेअर सुद्धा करतात आणि हे सगळं आमच्या बस मध्ये सुद्धा झालं. थोड्या वेळाने गाडी नाष्टासाठी थांबली. फूडमॉल वर थोड खाऊन तिथे बाहेर सर्व्हिस रोड च्या कडेला एक सुदंर ग्रुप फोटो असंच काढला जो अजूनही इंजिनीअरिंगच्या फोटोज् मधील मास्टरपीस आहे.गाडी पुन्हा निघाली...
आता सगळे जरा शांत होते, हेडफोन्स लाऊन बाहेरच्या रिमझिम पावसाचा आनंद घेत चालले होते. काही वेळानी गाडी पनवेल आणि नंतर उरण कडे पोहोचली, जवळ इतकं मोठं महानगर आहे याचा तिथे भास होऊ लागला, मोठमोठ्या इमारती नव्हत्या पण औद्यागिक क्षेत्राचा अंश दिसू लागला. रिलायन्स ग्रुपची. भलीमोठी गॅस पाईप्स दिसू लागली आणि समुद्राजवळची आद्रता हवेत जाणवू लागली. कंटेनरचे मागचे डबे..ज्यावर आपण नेहमी MAERSK हे नाव हायवेने बऱ्याच ट्रकच्या मागच्या कंटेनर वर बघतो तसल्या डब्यांचा इथे ढीग होता..!, MAERSK ही एक इंटरनॅशल स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे आणि मालाची ने-आण करते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात प्रथम आलं ते म्हणजे GTA VICE CITY..,ते शहर आणि त्यातील पोर्टचा जणू परिसर आज मी प्रत्यक्षात पाहत होतो, असे मला भासले. आता गाडी न्हावशेवा पोर्ट म्हणजेच जे एन पी टी या बंदराच्या जवळ आली. निमुळते आणि वळणदार रस्ते. तेथली नगरी वसाहत पार करून आम्ही थेट आता पोर्टच्या कर्याल्याच्या समोर सोडणाऱ्या रस्त्याने पुढे सरसावलो. समुद्र दिसू लागला, आम्ही सगळे कुतूहलाने बघू लागलो..गेल्या आठ दिवसांपासून बंदर डोक्यात होत आणि नानविविध कल्पनाही; त्या प्रत्यक्षात अश्या होत्या, कदाचित कल्पनेपेक्षा सुंदरच..!!, आणि एक चेक पोस्ट आलं..एखाद्या टोल गेट प्रमाणेच ते होतं. तेथे आम्हा सर्वांना उतरण्यास सांगितलं..व सर्वांना visiting आय कार्ड देऊन, सर्वांची ओळखपत्र तपासली गेली. आणि आम्ही रांगेने आत गेलो. बसही आत सोडली आणि आम्ही पुन्हा बस मध्ये बसलो.आमच्या सोबत तेथील एक काकाही आले, वयाने ५५ वर्षाचे तरी असतील ते तेथे नोकरीस होते, साधारणतः अर्ध्या किलोमीटर अंतरावर समुद्र दिसू लागला. आम्ही अत्यंत उत्सुकतेने पाहू लागलो, त्या काकांनी सूचना केली की मोबाईल कोणीही काढू नये, त्या बंदरावर काही भलीमोठी जहाजं उभी होती, अगदी ३-४ मजली इमारती एवढी!!.. आम्ही सारे अवाक होतो..गाडी अगदी पोर्ट जवळ नेण्यात आली...बंदर आणि किनारा यांमधील फरक किती मोठा असतो ते तेव्हा कळलं. आम्ही अजून गाडीतचं होतो म्हणून त्या जहाजांचे फोटो काढले, जे पाहून आजही मला तो क्षण तशाचा तसा आठवतो. आम्ही खाली उतरलो. थोड जवळ गेलो. खाली जी आहे ती जमीन नसून बांधकाम आहे. हे त्यातील फटांमध्ये पाहिल्यावर कळले, आता आम्ही समुद्राच्या वर होतो.तेथे चालतांना सुद्धा खूप सुंदर वाटत होते, भलीमोठी जहाजं आता आणखीनच भलीमोठी दिसू लागली, मी मघाशी म्हणालो की ती २-३ मजली असतील, पण मलाच अता ती ४-५ मजली वाटू लागली. अथांग समुद्र, दूरवर नजर न्यावी तिकडे पाणीच पाणी. निळ्याशार दिसणारं पाणी, ओसळणाऱ्या लाटा, पण तरीही त्याचा न होणारा होणारा स्पर्श काहीसा नाराजीचा होता. पण, आम्ही बंदरावर होतो किनाऱ्यावर नाही!, प्रत्येक जहाजं मालवाहतूक होत, आणि त्या मालाची लिफ्टींग करण्यासाठी Gantry girders होते, त्या gantry girders चं designing आम्हाला स्टील डिझायनिंग मध्ये होत त्यावर काही numericals सुद्धा होते म्हणून इथे जणू एक आपला ओळखीचा, आणि आपल्यातला माणूस उभा आहे असच आम्हाला वाटल, आणि आम्ही एकमेकांना कुतूहलाने दाखवू लागतो, "तो बघ gantry girder!", खूप मजेशीर होतं ते, हे सगळ निरीक्षण करत असतांनाच एक आवाज आला तो त्या काकांचा होता, ते आम्हाला आता सगळी माहिती सांगणार होते. त्यांनी आम्हा सगळ्यांना गोलाकार उभे केले, आणि यांनी सुरुवात केली, त्यांचा आवाज, उभे राहण्याची आणि बोलण्याची लकब पाहून, ही व्यकी अत्यंत मजेशीर आहे असं मला वाटलं आणि क्षणार्धात त्या काकांनी मला खर ठरवलं, ते खरचं मजेशीर होते, अगदी आजही आम्ही त्यांना त्यांना आठवलं की हसतो.. म्हणजे त्यांच्यावर नाही त्यांनी केलेल्या विनोदांवर.. त्यांनी सुरुवात केली, त्यांना त्या बंदराची तसेच त्या भागाची इत्तंभूत खबर होती. ते कोकणस्थ होते. मग आम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेतला ज्यात आमचे प्रोफेसर सुद्धा होते. हा फोटो जरी अगदी सहज असला तरी या अशा ग्रुप फोटोंच महत्व या visits मध्ये अनन्यसाधारण आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, लास्ट इअरला तर आमची एक road project visit जी syllabus मध्ये होती पण जी राहिली होती, ती आम्ही आणि आमच्या सरांनी फक्त कॉलेजच्या चौकात जाऊन, पोज देऊन एक ग्रुप फोटो काढून पूर्ण केली होती. त्या मजेशीर पोझ मध्ये सगळेच हसत होते आणि अगदी कोणीही सांगेल की, ही पोझ आहे. असा फोटो कलर प्रिंट करून फाईलला आम्ही लावला होता, ते सगळं पाहून external ने सुद्धा डोक्याला हात लावला असेल!!! असो, तर आम्ही फोटो काढला आणि बंदर सफारी करू लागलो, तेथून अगदी भुरसट स्वरूपात दक्षिण मुंबईच्या उंच इमारतीही दिसत होत्या.
जहाजांना जास्तकरून लाल रंग असतो, कारण तो दुरूनही ओळखता येतो आणि आपत्कालीन काळात याची मदत होते, जवळपास सरीच लाल जहाजं म्हणूनच तिथे होती, किंवा अंशतः लालच होती, बराचं वेळ त्या रम्य आणि सुंदर ठिकाणावर घालवल्यानंतर आम्ही पुन्हा बस मध्ये. एव्हाना खूप भूक सुद्धा लागली होती. आणि आता गाडी बंदराला विळखा घेऊन जे.एन.पी. टी. बंदराच्या मुख्य कार्यालयाकडे वळाली. मुख्य इमारत जवळच होती, अतिशय सुरेख बांधकाम होतं ते!..बाजूस छोटीशी बाग होती, तेथे आत बंदरातील कर्मचारी आणि अधिकारी यांची दालने होती, तसेच त्यांची कॅन्टीन देखील होती. आमचे प्राध्यापक आत परवानगीचा कागद घेऊन आत गेले, आम्ही त्या पलिकडील बागेत जाऊन बसलो. आज खरचं खूप वेगळा आणि अविस्मरणय दिवस आहे, ज्याच्या आठवणी आता नेहमीच आपण आपल्यासोबत घेऊन फिरणार आहोत, कुठे विषय निघालाच तर, "मी येथे गेलो आहे, हे मी पाहिले आहे!!" असं अभिमानाने सांगता येणार आहे. असं काहीसं माझ्या मनात चालू होतं किंबहुना अप्रत्यक्षपणे प्रत्येकाच्या!!, आम्ही तेथे ग्रुप मध्ये बसलो दुपारचे जवळपास २:३० वाजले असतील. वातावरण तसं ढगाळ होतं, आणि वेळेचं भान राहावं असा तो दिवसही नव्हता!! थोड्या वेळानंतर आम्ही आत गेलो. ती भलीमोठी इमारत होती, त्याच्या एका भागात त्या कर्मचऱ्यांची मोठी कॅन्टीन होती. तेथे आम्ही जेवणासाठी गेलो. "इथे काय जेवण असणार आता, त्यापेक्षा हायवेवर कुठेतरी ढाबा बघितला असता, असा सूर वाजत होता!", परंतु, तेथील स्वच्छता व जेवण पाहिल्यानंतर आमच्या भ्रमनिरास झाला. आमच्यासाठी म्हणून एक विशिष्ट मेन्यू तेथे केला होता आम्ही सगळे तेथे बसून जेवलो. थोड्या वेळानंतर पुन्हा त्या सगळ्यांचा जेवण झाल्यानंतर सारे बाहेर आलो. तेथूनही पोर्ट दिसत होता, तेथे काही फोटो काढून आम्ही निघालो, दरम्यान तेथे एक छोटे दुकान होते, आणि त्या दुकानातील दुकानदार काका हे आमच्या जळगांव जिल्यातील आहेत हे कळाले. मित्रांनी मला बोलावले व त्यांना सांगितले हा सुद्धा तेथीलच आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर कळाले की ते आमच्या अमळनेर तालुक्यातील च आहेत. त्यांनी अगदी आपुलकीने चौकशी देखील केली. खरचं गावापासून दूर असताना आपल्या गावाचं कोणी भेटलं तरी ती व्यक्ती आपल्याला अगदी आपलीच वाटते.
आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. दिवसभर दमल्याने सारे जरा शांत होते. गाडी पुन्हा पनवेलच्या दिशेने निघाली, नंतर बाहेर जोरात पाऊस सुरू झाला.रम्य दृष्य होते ते. मग द्रुतगती मार्गास लागली आणि वेगही वाढला. मग शांत असलेले आम्ही सारे पुन्हा जरा गोधळ करू लागलो. गाणे लाऊन नाचूही लागलो. मग त्यात कोणीतरी बोलला की, सगळ्यांनी सगळ्यांचा नाच सकाळी बघिलाच आहे, आता आवाज बघुयात. गाणी बंद करून सगळी गायला लागली. खर तर खूप छान दृश्य होत. बाहेर पाऊस, प्रवास आणि गाणी.. वाह!! मग सगळ्यांनी मला गाणं गायला सांगतलं..मी नुकतच NAAC इव्हेंट साठी 'सूर निरागस हो..." हे गीत गायले होते..आणि साहजिकच त्याची फरमैश झाली...मीही गायलो. राहत फतेह अली खान आणि मोमीन मुस्तेहन यांचं आफ्री आफ्रि गायालो. खरं तर खूप सुंदर गाणं आहे. हे गाणं बऱ्याच जणांनी ऐकत नव्हत आणि त्यांना आवडलं, मग त्यांना मी ओरिजनल क्लिप दाखविली. आणि त्यातील मोमिना मुस्टेहन या पाकिस्तानी गायिकेचा प्रेमात आमचं निम्न डिपार्टमेंट पडलं. आता तिच्या आशिक मंडळींत हे सारे सुद्धा आहेत. होय, सुद्धा म्हणजेच मी आधीच जाऊन बसलोय तिथे!!! आता थोडं अंधार पडू लागलं आणि गाडी ट्रॅफिक मध्ये अडकू लागली, वाकड जवळ आम्ही होतो. आणि सायंकाळची ट्रॅफिक! जवळपास एक - दीड तासांनी आम्ही पुन्हा नऱ्हेत पोहोचलो. आणि ती अविस्मरणीय ट्रीप कम् व्हिजिट किंवा व्हिजिट कम् ट्रीप संपली होती.
No comments:
Post a Comment