धर्म काय आहे. खरं तर मानव समाज आणि मानवी मूल्य हे मानवास शिकविण्यासाठी अत्यंत पवित्र आणि निर्मळ हेतूने तयार केलेली सुंदर गोष्ट. धर्म काय शिकवतो, तर धर्म आम्हास प्रेम शिकवतो, नाती शिकवतो, जिव्हाळा शिकवतो....अजुन धर्म काय शिकवतो, तर तो बंधुप्रेम, पिताप्रेम, नम्रता, शांतता, परिवार, समाज, मित्र, बहीण, पत्नी, पती, मातापिता, आदर, या सगळ्या आणि याहून अधिक गोष्टी अगदी उत्तमपणे मांडतो.
खरं तर प्रत्येक धर्म खूप श्रेष्ठ आणि सुंदर आहे. कारण त्याचा उद्देश इतका पवित्र आहे की त्यात तुलना हे भावचं नाहीत. ते निर्मळ आहेत. खर तर अशा सुंदर उद्देशाने आणि मानवी जीवन मुल्यांनी आणि संस्कारांनी भरावं म्हणून असलेला धर्म जो कुठलाही असो ती खरंच किती श्रेष्ठ आहे!!.. तर मग आपण धर्मावरून खरं तर का भांडतो? ही अशांतता कुठून येते? आणि ही उच्च - नीच्च भावना येते तरी कुठून? तर ती येते तो धर्म चुकीच्या पद्धतीने आणि गलिच्छ मानसिकतेने पसरविणाऱ्या लोकांमुळे...कारण आपण आपला धर्म मानतो खरी पण तो वाचत नाही. हिंदू, इस्लाम, ख्रिचन, बौद्ध आणि इतर कुठलाही धर्म असो यात कधीही भेद नाही शिकवला. पण तो कदाचित पसरविण्यात आला. अज्ञान वाईट.. खरचं अज्ञानाने सारं काही नेलं. असं महात्मा जोतिबा फुलेंनी का म्हटलं असेल याचं प्रात्यक्षिक जणू आहे हे सगळं. धर्म निर्माण कसं झाला??... खरं तर विविध रूपानं मानव सुधारून त्याला सारं काही शिकवावं जे सांसारिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध पैलूंवर उत्तमपणे खेळता यावं.त्याला सगळं हाताळता यावं मणून धर्माची निर्मिती झाली असावी. आणि सगळ्या धर्मांनी मानव जीवन सुखकर आणि समृद्ध करण्याठी अमूल्य योगदान दिले आहे. यामुळे भेद न करता आपल्या धर्माबरोबर सगळ्या धर्माचा आदर करणे हे मानवीय आहे. बाकी सारे अमानवीय!! कारण ज्या गोष्टी आपल्या म्हणजेच मानवाच्या प्रगतीशीलतेसाठी आहेत त्यावरून भांडणे म्हणजे कदाचित विवेकी गहाण ठेवणे!!...
आपण काय बदल करू शकतो?
आपण प्रत्येकानी आपल्या समाजातील किंवा परिसंस्थेतील सर्वांनी आपल्या व इतर सर्व धर्मांची धर्मग्रंथ वाचावीत. आणि कोण दुसऱ्याच्या सांगण्यावर न जाता आपण तो निष्ठेने वाचवा. आपल्या मनातील सगळी धूळ निघाल्याशिवाय राहणार नाही. काही क्रूर आतंकवादी संस्था बालमनावर देवाच्या नावानं आणि धर्माच्या नावावर काहीही सांगून द्वेषाची भावना निर्माण करतात जे की मानवी जातीसाठी धोक्याचे आहे. धर्म ही उन्नतीची गोष्ट आहे. धर्म आपल्यासाठी आहे, आपण धर्मासाठी नाही, हा विचार रुजायला हवा. धर्म भेद कधीही शिकवत नाही. तो मानवता मात्र शिकवतो आणि आपण त्याच धेमाच्या नावाने भेद करतो. याहून मोठा अपमान धर्माचा काय असू शकतो!...एखादा प्रदेश हा विशिष्ट धर्माचा आहे, आणि त्यामुळे इतरांवर अन्याय करणे हे कुठलाही धर्म सांगत नाही. धर्म शिकवतो तो समभाव, मित्रत्व, प्रेम ती भावना ठेवली तर सगळे धर्म अबाधित राहतील आणि आपल्यातच जिवंत राहतील. त्याला वाचवण वगैरे आणि त्या नावाखाली द्वेष निर्माण कारण या गोष्टी होणार नाहीत.
आपला अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान छ्त्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी कधी धर्म पाहून राजकारण केलं नाही, कधी मैत्री आणि शत्रूही नाही. महाराजांनी धर्म हे कधीही मोजमाप म्हणून न वापरून फक्त प्रगतीसाठी वापरलं आणि रयातेच कल्याण केलं. आजही काही अज्ञानी वर्ग असं मानतो की महाराज फक्त हिंदुराजे होते आणि दुसऱ्या धर्माशी ते लढले आणि त्यांचा उद्देश धर्म वाचवन होता..किती चुकीची माहिती घेऊन फिरतात काही लोक..महाराज मुघलांशी लढले इस्लाम धर्माशी नाही. महाराजांना आणि छ्त्रपती शंभूराजांना देखील कुराण माहित होते. महाराजांना सर्व धर्मांची शिकवण माहीत होती, अंगीकृत होती. आणि ते लढले ते कल्याणासाठी, ते जिंकले ते शुद्ध आणि निर्मळ हेतुमुळे, आणि मुघल हरले ते कपटी, धर्मवादी, जातीवादी हेतूंमुळे.. मग जर महाराज कधी भेद करत नव्हते तर आपण कोण आहोत?
No comments:
Post a Comment