///
शांत झाल्या ज्वलंत मशाली,
मनातले काहूर पडले सर्वात भारी!
विचार उरले गुंफत गेले,
मन उरले वाहत गेले,
वाटे जणू सारेच थांबले;
मी विझलो तेव्हा...
रात्र माझी झाली परकी;
दिशा माझी झाली फिरकी,
काळोखही वाटे चांदणे विरहित;
उजेडात काळोखाच्या रेषा गिरवीत,
स्तब्ध असे झाले सारे,
मी विझलो तेव्हा....
विचारांनी केलं रान काबीज,
प्रश्नांनी केलं भान काबीज,
पारतंत्र्य जणू केले तयांनी!
मस्तक जणू चार भिंतीत,
मी विझलो तेव्हा..
काही थोडे दूर झाले, काही थोडे दूर गेले;
माझे जे नव्हतेच ते न मजजवळ राहिले,
काही अधिक जवळ भासले;
मुखवटे जणू साऱ्यांनीच फेकले,
अन् नव्या चेहऱ्याचे जग दिसले,
मी विझलो तेव्हा...
नविन थोडे रूप कळले,
अस्थैर्यात स्थैर्य कधी टिकावले;
सामर्थ्य हे पुन्हा उमगले,
धाडसाचे प्रात्यक्षिक करुनी गवसले,
नैराश्याशी सामन्याचे सामनावीर कधी ठरले,
मी विझलो तेव्हा...
दिवा टिकविण्याचे प्रकार कळले,
तेल कधी वात बदलणे कळले,
वात थोडी पुढे सरकवने उमगले,
वादळी माझ्या सप्नांचे,
कडाडणाऱ्या विजांना भिणेही सरले;
मी विझलो तेव्हा...
विझणे जाहले असे सारे,
पण विझणे ना झेपते रे,
न परवडण्याजोगते रे,
हे वैचारिक पारतंत्र्य संपविनारे,
शूर सैनिक कधी व्हावेच लागते रे,
पुन्हा उठून पेटावे मात्र लागतेच रे...!
No comments:
Post a Comment