"सूर जुळले, मन जुळले
मग अडते कुठे रे घोडे?
अरे! राहिले ना पत्रिका जुळणे!
जूळवून बघ ते ग्रह तारे,
शनी मंगळाचे ते प्रभाव सारे,
गुण दोष आणि वगैरे वगैरे!!"
"प्रभाव थोडा जास्त आहे म्हणे;
ग्रहाचा कुठल्यातरी...!
क्रिया कर्म करून बघू;
उत्तर सापडेल तरी!!"
"होय सापडेल ना!,
हजारो प्रकाशवर्षे दूर म्हणजे काय
अधिक नव्हे ते!!,
तुझ्यावरच प्रभाव असणे
हे काही बरे नव्हे रे..!
सोबतच जाणून ही घे;
सारे मुहूर्त कुठले बरे चांगले..!
असोत, रोजचेच सूर्य आणिक नभ,
ईश्र्वरचे सारे काल आणि समय..
तरी, खात्री करून घे बाबा तोच सुनिश्चय..!!
कोठली समस्या आहे अजून आणिक"
"देव दर्शन ही घडले नाहीये म्हणे
तिथेच तर तुमचे चुकले खरे
आता ते आधी करून घेतो बरे"
"होय कर ना, करायलाच हवे..
धार्मिक स्थळे सारी तेथे तर जायलाच हवे.?
असो लिहिलेले धर्मात जरी,
देव सर्वत्र आहे तरी..
देव दडलाय सर्वतोपरी,
तुझ्या माझ्यात राहतोय जरी,
कला विज्ञानात वावरतोय तरी,
भेट होते ती मंदिरातच ना रे..
जाऊनी ये बाबा लवकरी..
अजून काय म्हणलेत तुला?""
"तेल वाह तू पिंडीवर,
दूधही असले तर उत्तम होई...
कमी न पडले पाहिजे काही,
सारे होईल मग उत्तम तरी..
मग करतो तसे, काय म्हणता?.."
"हो नक्कीच, का नाही..,
गेले वाहून ते तेल जरी,
पिंडी मागे असेल जरी नळी,
जाऊ दे ना वाया, आपले काय जातेय तरी!
असोत बाहेर दहा भिकारी;
किंवा असोत पेन विकणारे ते स्वाभिमानी..
तेल दूध जरी नसले तरी,
जगतायत ना ते कसेतरी..
काय फरक पडेल आपल्या वेगळ्या वागण्याने;
बरोबर ना रे..!
तू जा जा बाबा टाक ना रे;
तेल दूध आणि दही!!
आणि अजून काय म्हटले बर ते..?"
"हातात धागा दिलाय आणि
बांधलाय बघ उजव्या हाती
पण,
पण,
पण, नाही मित्रा गरज याची..!
उमगतेय मला चूक माझी!!
तू होतास बरोबर मी चुकलो,
धन्यवाद उघडलेस माझे डोळे,
खरेच..,
ना रेषा, ना धागे करतील मनगट बळकट;
ना मुहूर्त, ना फक्त देवदर्शने करतील जीवन पवित्र;
ना राशी, ना तारे देतील कोणताही त्रास,
धरू विज्ञानाची कास, आणि ठेऊ देवावर विश्वास
कर्मकांडाचं माहित नाही, परी कर्मावर सोडू निःश्वास....
~ प्रतिक विकास पाटील
Insta handle- @writistic_views
No comments:
Post a Comment